World Cup 2023

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला डच्चू?

1345 0

मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

बीसीसीआय निवड समितीने आशिया कपच्या 18 खेळाडूंमधून वर्ल्ड कपसाठी 15 जणांची निवड केली आहे. या संघातून संजू सॅमसन, तिलक वर्मा, अनुभवी फिरकीपटू आर अश्विन, ओपनर शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. संजू सॅमसन याचा आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियात राखीव विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला होता.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

Share This News
error: Content is protected !!