समृध्दी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

887 0

समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून १४ कामगारांचा यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना पुलावरील क्रेन गर्डरसह कोसळली. समृद्धी महामार्गावर शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरळांबे येथे पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत १४ कामगार ठार झालेले आहेत.

तसेच आणखी २०-२५ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. मध्यरात्रीपर्यंत चौदा कामगारांचे मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले होते.

दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!