पूजा खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवलेली ती गाडी पोलिसात जमा करण्याचे आदेश
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कार वर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भातील नोटीस देखील पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हाट्सअप द्वारे पाठवलेली आहे. याच गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पाहताच खेडकर कुटुंबीयांनी दार बंद करून घेतले होते. मात्र यावेळी त्यांच्या दाराच्या बाहेर तुझी गाडी झाकून ठेवण्यात आली होती ती हीच ऑडी कार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
पूजा खेडकर यांनी आपल्या खाजगी MH -12 AR 7000 क्रमांकाच्या ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. आणि हीच गाडी घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जात असायच्या. याच प्रकरणामुळे पूजा खेडकर या चर्चेत आल्या. त्यामुळे त्यांच्या या गाडीवर पोलिसांनी 21 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान खेडकर यांच्या बंगल्यात अनेक गाड्या होत्या यापैकी जी गाडी झाकून ठेवण्यात आली होती ती हीच ऑडी होती. या गाडीवर आता पोलिसांनी 177 अंतर्गत कारवाई करण्याचे ठरवले होते. मात्र खेडकर यांनी दरवाजांना उघडल्यामुळे पोलिसांना आत प्रवेश करता आला नाही. या गाडीचा उपयोग नियमबाह्य कामांसाठी होत होता. त्यामुळे यासंदर्भातला पुढील तपास करण्यासाठी ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आज खेडकर कुटुंबीयांनी गाडीवर कारवाई करू दिली नसल्यामुळे आता ते स्वतः ही गाडी जमा करतात का हे पाहणे महत्वाचे आहे.