नुकतंच फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झालं असून आज या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचा वाटप देखील करण्यात आला आहे या पाठोपाठ आता मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचा वाटप देखील करण्यात आलं असून पर्यावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळाला कोणता बंगला
राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष – ज्ञानेश्वरी
राम शंकर शिंदे, विधानपरिषद सभापती – शिवगिरी
चंद्रशेखर बावनकुळे -रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन
हसन मुश्रीफ – क 8 विशाळगड
चंद्रकांत पाटील – ब 1 सिंहगड
गिरीश महाजन – सेवासदन
गुलाबराव पाटील – जेतवन
गणेश नाईक – ब4 पावनगड
दादा भुसे – ब 3 जंजिरा
संजय राठोड – शिवनेरी
धनंजय मुंडे – सातपुडा
मंगलप्रभात लोढा – ब 5 विजयदुर्ग
उदय सामंत – मुक्तगिरी
जयकुमार रावल – चित्रकूट
पंकजा मुंडे पर्णकुटी
अतुल सावे .अ-३ शिवगड
अशोक उईके अ-९ लोहगड
शंभुराजे देसाई मेघदूत
श्री. आशिष शेलार ब-२ रत्नसिंधु
Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर