Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

670 0

मुंबई- आज सकाळपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस सुप्रिया सुळे, प्रफ्फुल पटेल हे सुद्धा या बैठकीस हजर होते.

त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात तात्काळ पत्रकार परिषद घेत अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना आमदारांची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. असे विधान करून पवारांनी यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला होता.

पण अचानक अजित पवारांचे पीए राजभवनाकडे दाखल झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. आता राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा , शिवसेना, आणि अजित पवार यांचे समर्थक राजभवनावर दाखल झाले आहेत. आज राजभवनवर संध्याकाळी शपथ विधी सोहळा पार पडेल. आजच्या बैठकीला शरद पवारांचा पाठिंबा नाही आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.  राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!