Aditya Singh Rajput

‘गंदी बात’ फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

1034 0

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा मृत्यू (Pass Away) झाला आहे. त्याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आढळून आला. यानंतर त्याच्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

कोण आहे आदित्य सिंह राजपूत ?
आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे. आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. त्याच्या माघारी आई,वडील, एक मोठी बहीण असा परिवार आहे. आदित्यच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आदित्य सिंह राजपूतने काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच त्याने ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘गंदी बात’ या शोमध्ये काम केले आहे. त्याला खरी ओळख ‘गंदी बात’ (Gandi Baat) या शोमुळे मिळाली.

Share This News
error: Content is protected !!