मोठी बातमी! माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात

509 0

अमरावती: शिंदे गटातील प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती मिळत असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्ता क्रॉस करतांना ही घटना घडली. 

अमरावतीच्या खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

दरम्यान, मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे  आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला.

Share This News
error: Content is protected !!