ब्रेकिंग … पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 5 जखमी

543 0

लोणावळा- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज, मंगळवारी सकाळी चार वाहने एकामेकाना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बोरघाटात घडला.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दोन मार्गिकेमधून दोन कंटेनर जात होते. त्यावेळी मागील छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच राहिली नव्हती. या दोन कंटेनरमधून वेन्यू कारने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली . त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यु झाला. तर तिच्या मागोमाग येणारी आणखी एक कार त्यांना धडकली. एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट व वेन्यू कार अशी चार वाहने या अपघातात सापडली आहेत.

त्यात 5 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यु टीम आणि खोपोली, खंडाळा महामार्ग पोलीस दाखल झाले.  या अपघाताने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले.

Share This News

Related Post

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य…

शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, सासवडमधील घटना

Posted by - May 18, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात सासवड पोलीस…
Bribe News

Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; ‘एवढ्या’ रुपयांची स्वीकारली लाच

Posted by - February 29, 2024 0
धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची (Bribe News) मागणी…

PMPML च्या E-Bus ने सिंहगडावर प्रवास करण्याच्या निर्णयाविरोधात किल्ले सिंहगड बंद आंदोलन

Posted by - May 16, 2022 0
पुणे- खासगी वाहतूक बंद करून फक्त पीएमपीएमलच्या ई-बसने सिंहगडावर प्रवास करता येईल या निर्णयाच्या विरोधात किल्ले सिंहगड येथे राजे शिवराय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *