विधानसभेआधीच घोषणांचा पाऊस; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले तब्बल इतके निर्णय

44 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबधणी करताना पाहायला मिळत आहे.

अशातच राज्यातील महायुती सरकार ॲक्शन मोडवर आलो असून आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 38 निर्णय घेण्यात आलेत यामध्ये सरपंच उपसरपंचांबरोबरच कोतवालांच्या मानधनांमध्येही वाढ करण्यात आली असून अनुकंपात धोरण लागू करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 34 निर्णय घेण्यात आले होते त्यानंतर आज झालेला बैठकीत 38 निर्णय घेण्यात आलेत

नेमके कोणते निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले? 

  •  कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
  •  ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
  •  ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
  • ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
  • देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
  •  भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
  • रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
  •  राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
  •  जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
  •  लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
  •  धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
  •  रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
  •  केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
  •  पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
  •  धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
  •  सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
  •  अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार
  •  सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
  •  जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
  • राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ
  •  नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार
  •  आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
  •  राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण
  • आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
  •  श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ पर्यंत करण्याचा निर्णय
  •  अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित

  • बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था
  •  मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
  • जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
  •  पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
  •  राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे
  •  शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही
  •  अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर
  • माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला
  • राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
  •  डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ
  •  महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा
Share This News

Related Post

5 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

Posted by - March 23, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून…

घोडीवर मांड ठोकून डॉ. अमोल कोल्हे बैलगाडी शर्यतीत, दिलेला शब्द पाळला

Posted by - February 16, 2022 0
पुणे- बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार डॉ. यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण माजी…
Vishal Patil

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Posted by - May 6, 2024 0
सांगली : लोकसभा निवडणुकीत (Sangli Loksabha) उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्याची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश…

Election Result 2022 : गुजरातेत भाजप सातव्यांदा सत्तेत; हिमाचलमध्ये मतदारांनी 40 वर्षांची परंपरा राखून काँगेसलाच मतदान

Posted by - December 8, 2022 0
Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपने अक्षरशः सगळ्यांचा दारुण पराभव आहे. 1985 मध्ये काँग्रेसने राज्यामध्ये 149 जागा जिंकल्या होत्या. तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *