हाफकिन’ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधी न मिळाल्याने परिणामी अत्यवस्थ रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.
यात नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे.