उद्या 1 वाजता लागणार दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल निकाल?

806 0

मुंबई : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कुठे पहाल निकाल?
www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तर www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

SSC Result 2023 : असा पाहा निकाल
स्टेप 1) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!