PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: 42 प्रभाग 165 नगरसेवक;चार सदस्यीय प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची?

503 0

PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून कालबद्ध सूची कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असून दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान 2017 च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्य प्रभाग पद्धतीनुसार पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे.

ही प्रभाग रचना कशी असेल आणि चार सदस्य प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची ठरू शकते यावरचा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

Pune Mahapalika : Dheeraj Ghate यांनी दंड थोपटले!105 जागा सोडून बोला! Bjp स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार असून यामुळे पुण्यात 42 प्रभाग आणि 165 इतकी नगरसेवकांची संख्या असणार आहे.

पुणे महानगरपालिकेत 34 गाव समाविष्ट करण्यात आले होते

Murlidhar Mohol : पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले निवेदन

यापैकी उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांची स्वतंत्र नगरपरिषद मंजूर झाल्यानंतर ही गाव पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळण्यात आली होती.

यानंतर उर्वरित 32 गावांची 2011 च्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावांची लोकसंख्या 34 लाख 81 हजार 900 होती.

त्यानुसार प्रभागाची संख्या 42 राहणार असून, नगरसेवकांची संख्या 165 राहणार आहे.

Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पालिका आयुक्तांनी सादर करावी

त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर असणार आहे.

या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी प्रसिद्ध करावी.

त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनावर राज्यसरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे.
या हरकती सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल

SPECIAL REPORT : महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा – तोटा कुणाला ? VIDEO

त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला मान्यता देतील आणि पालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील.

दरम्यान सत्ताधारी भाजपानं आपल्या फायद्यासाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला आहे.

प्रत्यक्षात या प्रभाग रचनेचा फायदा कुणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!