पुणे महानगरपालिका : अखेर 25 वर्षानंतर ‘त्या’ 23 गावातील मिळकतदारांना मिळणार मालकी हक्काचा पुरावा

233 0

पुणे : 1997 साली पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आला होता.तेव्हापासून आजपर्यंत या 23 गावांमधील मिळकतदारांना मालकी हक्काचा पुरावा देण्यात आला नव्हता. अखेर त्यासाठी करावे लागणारे सर्वेक्षण भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे.                                                                                                                                                  या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण पूर्ण झाल्याने या 23 गावांच्या प्रॉपर्टी कार्डचा मार्ग मोकळा झाला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील या 23 गावांमधील मिळकतींना तब्बल 25 वर्षानंतर प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1997 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या 23 गावांचा समावेश करण्यात आला या गावातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने निधीची तरतूद करून भूमी अभिलेख विभागाकडून 2007 साली समाविष्ट गावातील मिळकतींचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते.                                                                                                                                                                                 मात्र त्यानंतर सरकारकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने हे प्रकरण मागे पडले होते. मात्र आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या प्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहेत. लवकरच संबंधित गावातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!