Heavy Rain

राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

420 0

पुणे : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे पुढचे काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Department) वर्तवण्यात आली आहे.

‘या’ 7 जिल्ह्यांना गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट (hailstorm) आणि मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंट अलर्ट (Orient Alert) जारी केला आहे. तसेच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाळयात पावसाळ्यासारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!