नीती आयोग आणि जागतिक अन्न कार्यक्रम संयुक्तपणे एकत्रित उपक्रम राबवणार

227 0

नवी दिल्ली : आशिया आणि आफ्रिकेमध्ये भरड धान्य या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी निती आयोग आणि वर्ल्ड फुड प्रोग्रॅम , इंडिया अर्थात जागतिक अन्न कार्यक्रम संयुक्तपणे “प्रतिचित्रण आणि चांगल्या पद्धतींचे आदानप्रदान” (मॅपिंग आणि एक्सचेंज ऑफ गूड प्रॅक्टिसेस) हा उपक्रम उद्द्या 19 जुलै 2022 रोजी आयोजित करणार आहे.

भारतात आणि परदेशात भरड धान्यांचं उत्पादन आणि वापर यात वाढ व्हावी यासाठी नीती आयोग आणि डब्ल्यू एफ पी जगभरातील या संदर्भातील चांगल्या पद्धतींचा संकलन असलेला संग्रह तयार करत आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते होणार आहे.त्यांच्याबरोबर सदस्य,प्रोफेसर रमेशचंद आणि सल्लागार डॉक्टर नीलम पटेल, वर्ल्ड फुड प्रोग्रॅम चे प्रतिनिधी आणि भारतातील संचालक बिशो प्रांजूली, नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी चे सीईओ डॉक्टर अशोक दलवाई आणि कृषी मंत्रालयाचे सहसचिव शूभा ठाकूर यावेळी उपस्थित असतील.

आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन केंद्र (ICAR,)चे प्रतिनिधी, केंद्रीय आणि राज्य सरकारचे विभाग, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित उद्योग, केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठे,फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन अर्थात कृषी उत्पादक संघटना (FPOs,) गैर सरकारी संघटना (NGOs,) स्टार्ट अप्स, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फोर सेमी अरिड टॉपिक्स(ICRISAT) म्हणजेच शुष्क प्रदेशातील पीकांसाठीचे आंतरराष्ट्रीय पीक आणि संशोधन संस्था, फूड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना(FAO), सिंचन आणि जलनिस्सरण राष्ट्रीय आयोग (ICID),आदि या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!