Monsoon Update

Monsoon Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात 48 तासांत मान्सून होणार दाखल

677 0

पुणे : जून महिना संपत आला तरी अजून राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल न झाल्याने नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र आता हवामान विभागाकडून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच पुढील 48 तासांत मान्सूनच्या (Monsoon Update) सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे ही मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मान्सून येत्या 48 तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस ?
पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात या मान्सूनच्या सारी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरु होण्याची शक्यता आहे.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
पावसाचं पुनरागमन (Monsoon Update) झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. पावसाअभावी कोवळी पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच खोळंबलेल्या पेरण्या अन् दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या महीना झाला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!