मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यावरील भूमिकेसह इतर विषयांवर भाष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.
राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहात तुम्ही. काय तर म्हणे बाळासाहेब असते तर त्यांना आत्ताचं सरकार पाहून आनंद वाटला असता असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत असल्याची टीका आदित्य ठाकरेंवर राज ठाकरेंनी केली.
