संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर 19 मे रोजी निर्णय

470 0

मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई सत्र न्यायालय अटकपूर्व जामिनावर निकाल देणार आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज मुंबई स्तर न्यायालयात सुनावणी झाली. संदीप देशपांडे यांच्या वतीने वकील सुजित जगताप यांनी युक्तिवाद केला. संदीप देशपांडे याना जामीन मंजूर करू नये असे राज्य सरकारकडून नायायालयात सांगण्यात आले. जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते दोघेही राजकीय नेते आहेत, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला.

राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही युक्तीवाद केला. “संदीप देशपांडे आणि इतर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातून जेव्हा बाहेर आले, तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना बाजूला नेलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलून येतो, असं सांगितलं. मात्र दोघांचा इरादा वेगळाच होता. माध्यमांशी बोलण्याचा केवळ बनाव त्यांनी केला. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले. जर ते सुजाण नागरीक आणि कायद्याचा पालन करणारे असते तर त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं असतं”, असं सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले.

मनसेतर्फे वकील सयाजी नांगरे यांनी युक्तीवाद केला. सयाजी नांगरे म्हणाले, “आम्ही पोलिसांना धक्का दिलेला नाही. पोलीस तक्रारारीत देखील कुठेच नाहीये की, आम्ही पोलिसांना धक्का दिला. त्यामागे पळत आल्या आणि ड्रायव्हरनं गाडी पुढे नेली त्यावेळी त्या पडल्या”

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!