पुणे महापालिका निवडणूक; 20 प्रभागांची नावे बदलली, जाणून घ्या कोणते आहेत हे प्रभाग

353 0

पुणे – आगामी पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. राजकीय पक्षही निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. पुणे महापालिकेने नुकतीच निवडणुकीची अंतिम प्रभाग यादी जाहीर केली आहे. मात्र आता महापालिकेने जाहीर केलेल्या अंतिम प्रभागांच्या यादीत एकूण 20 प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत.

पुणे महापालिकेने मार्च महिन्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला होता. यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुणे महापालिकेने नुकताच प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. या निवडणुकीसाठी एकूण 58 प्रभाग असून त्यापैकी 20 प्रभागांचे नामांतर करण्यात आले आहे.

तपशीलवार यादी तपासा –
1. पूर्व खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक 4),

2. पश्चिम खराडी-वडगाव शेरी (प्रभाग क्र. 5),

3. वडगाव शेरी-रामवाडी (प्रभाग क्र. 6),

4. बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रभाग क्र. 11),

5. पंचवटी-गोखलेनगर (प्रभाग क्र. 15),

6. शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्र. 17),

7. छत्रपती शिवाजी महाराज मैदान-रस्ता पेठ (प्रभाग क्र. 19),

8. पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (प्रभाग क्र. 20),

9. कोरेगाव पार्क-मुंढवा (प्रभाग क्र. 21),

10. मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी (प्रभाग क्र. 22),

11. वानवडी गावठाण-वैदूवाडी (प्रभाग क्र. 26),

12. कासेवाडी-लोहियानगर (प्रभाग क्र. 27),

13. महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ (प्रभाग क्र. 28),

14. महात्मा फुले मंडई-घोरपडे पेठ उद्यान (प्रभाग क्र. 29),

15. भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (वॉर्ड क्र. 32),

16. आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी (वॉर्ड क्र. 33),

17. बिबवेवाडी-गंगाधाम (वॉर्ड क्र. 40),

18. काळे-बोराटेनगर-ससाणेनगर (प्रभाग क्र. 44),

19. बालाजीनगर-शंकर महाराज मठ (प्रभाग क्र. 49),

20. वडगाव बुद्रुक-माणिकबाग (प्रभाग क्र. 51).

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर…

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा…

अखेर शिंदे आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Posted by - October 6, 2022 0
जुन्नर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकिय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात गोल्ड हाईस्ट ! सराफाला बोलण्यात गुंतवून दागिने केले लंपास

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून…

स्मरणीय रात्र: ब्रम्हाकॉर्पच्या ‘स्टारलिट सोइरी’ मध्ये ग्रोथ पार्टनर्सचा भव्य सन्मान

Posted by - September 3, 2024 0
स्मरणीय रात्र: ब्रम्हाकॉर्पच्या ‘स्टारलिट सोइरी’ मध्ये ग्रोथ पार्टनर्सचा भव्य सन्मान पुणे – लक्झरी रिअल इस्टेटच्या उच्चवर्गीय क्षेत्रात, जिथे उत्कृष्टता आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *