प्रवीण तरडेंचा सरसेनापती हंबीरराव मोहिते लाजवाब, चित्रपटाचा ट्रेलर पाहा

383 0

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या सिनेमात प्रवीण तरडे यांनी हंबीरराव साकारला आहे. ही भूमिका त्यांनी अप्रतिम साकारल्याचे या ट्रेलरमधून दिसत आहे. येत्या 27 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे सेनापती होते. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांचा इतिहास पुन्हा उलगडणार आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तरुण अभिनेता गश्मीर महाजनी याने.

गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बरेच अडथळे आले होते. त्यामुळे प्रदर्शनालाही विलंब झाला . मात्र अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची झलक पहायला मिळते. प्रवीण तरडेच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील दमदार संवादही विशेष लक्ष वेधून घेतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!