पुणे: पुण्यातील मुंढवा येथील 43 एकरच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे.
या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.