VISHWAS PATIL | AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA SAMMELAN 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात संपन्न होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासकार विश्वास पाटील यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
VISHWAS PATIL | AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA SAMMELAN: साताऱ्यात शाहू स्टेडियम या ठिकाणी साहित्य संमेलन संपन्न होणार असून साताऱ्यात होणारं हे चौथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे.
पुणे येथे झालेल्या अखिल बैठकीत एकमतानं विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असून साताऱ्यातील शाहू स्टेडीयममध्ये संमेलन संपन्न होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची पानिपत आणि संभाजी या ऐतिहासिक कादंबरी सर्वाधिक गाजल्या असून
याशिवाय नॉट गॉन विथ द विंड, महानायक, बंदा रुपया, अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान, गाभुळलेल्या चंद्रबनात , नागकेशर , लस्ट फॉर लालबाग या आणि अशा अनेक कादंबरीचे लेखन केले आहे.
याशिवाय ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.