शिर्डीतील काकड आरतीसाठी भोंग्याची परवानगी द्यावी- मुस्लिम समुदायाची मागणी

431 0

शिर्डी- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणचे भोगे बंद करण्यात आले. शिर्डीमध्येही मशिद आणि मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील काकड आरती भोंग्याविना झाली. याच पार्श्वभूमीवर साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारतीसाठी भोंगे वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समुदायाकडून करण्यात आली आहे.

साई मंदिरात दररोज काकड आरती आणि शेजाआरती केली जाते, आणि यावेळी लाऊडस्पिकरचा वापर केला जातो. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर हे भोंगे हटविण्यात आले.

यामुळे मुस्लिम समुदायाने पुढाकार घेत आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!