प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

613 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत नुकताच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. त्याच व्हिडिओला शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचाच एक व्हिडिओ शेर करून प्रत्युत्तर दिले आहे.

या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणतात…

‘ मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमचा शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता’ हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, “हा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नकल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसून अनेक पावले मागे असतात.

राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओत बाळासाहेब काय म्हणतात ?

राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भगवी शाल परिधान केलेले दिसत आहेत आणि त्यांच्या मागे पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत, “ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील, कारण धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. जर आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide