HOW TO MAINTAIN URIC ACID LEVEL: हल्ली यूरिक ॲसिड लेवल वाढली आहे अशा तक्रारी तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकांकडून ऐकल्या असतील पण यूरिक ॲसिड लेवल वाढणं म्हणजे नेमकं काय होतं?

HOW TO MAINTAIN URIC ACID LEVEL: शरीरात युरिक ॲसिड पातळी वाढलीये ? कमी करण्यासाठी साधे उपाय

246 0

HOW TO MAINTAIN URIC ACID LEVEL: हल्ली यूरिक ॲसिड लेवल वाढली आहे अशा तक्रारी तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकांकडून ऐकल्या असतील

पण यूरिक ॲसिड लेवल वाढणं म्हणजे नेमकं काय होतं?

त्या मागची कारण काय आहेत? आणि रोजच्या आहारातून यूरिक ॲसिड

लेवल कशाप्रकारे नियंत्रणात ठेवता येईल? चला जाणून घेऊयात…

HOW TO MAINTAIN URIC ACID LEVEL : शरीरात युरिक ॲसिड पातळी वाढलीये ? कमी करण्यासाठी साधे उपाय
सर्वप्रथम यूरिक ॲसिड म्हणजे काय?

तर युरिक ऍसिड हे शरीरामध्ये निर्माण होणारे एक नैसर्गिक रसायन आहे,

जे ‘प्युरिन’ या संयुगांच्या विघटनामुळे तयार होते.

प्युरिन हे शरीराच्या पेशींच्या DNA आणि RNA मध्ये असतात आणि

काही अन्नपदार्थांमध्येही जसे की लाल मांस, समुद्री खाद्यपदार्थ आणि अल्कोहोल मध्ये आढळतात.

यूरिक ॲसिड हे एक नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे जे शरीर प्युरीनचे विघटन करत असताना तयार होते.

आता शरीरातील यूरिक ॲसिड चा संतुलन दोन प्रमुख प्रक्रियांवर अवलंबून असतं

पहिलं म्हणजे उत्पादन : पचन आणि चयापचय क्रिया दरम्यान पासून युरिक ऍसिड तयार होते
दुसरं म्हणजे निर्मूलन : मूत्रपिंड रक्तातील यूरिक ॲसिड फिल्टर करतात आणि ते युरीन द्वारे बाहेर काढतात.

जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा जास्त उत्पादनामुळे किंवा कमी प्रमाणात उत्सर्जन झाल्यामुळे ऍसिडची पातळी वाढते

ज्यामुळे हायपर युरेसेमिया नावाची स्थिती निर्माण होते.

यूरिक ॲसिडची पातळी वाढण्याची कारणं काय आहेत पाहुयात..

तर यूरिक ॲसिड वाढण्याची अनेक कारणे असू शकतात

यामध्ये रेड मीट, ऑर्गन मीट, सी फूड आणि साखरेचे पेय अधिक प्रमाणात खाणे.

Health News : कसा असावा आपला उन्हाळ्यातील आहार

डिहायड्रेशन, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या,

मधुमेह उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार, काही औषधांमुळे सुद्धा यूरिक

ॲसिडची पातळी वाढू शकते, आणि सर्वात महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे मद्यपान…

विशेषतः बियर आणि स्पिरिट हे युरिक ऍसिड काढून टाकण्यात अडथळा निर्माण करतात.

Health Tips : रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ 5 सवयी लक्षात ठेवा; 15 दिवसांत वजन होईल कमी

काय असतात लक्षणं?

सांधेदुखी आणि सूज, वारंवार सांधे कडक होणे,

यूरिक ॲसिड क्रिस्टल तयार होणं, वारंवार किडनी स्टोन होणे,

सांध्या भोवती त्वचेला लालसरपणा किंवा उष्णता, थकवा आणि अस्वस्थता अशी लक्षणे

शरीरातील यूरिक ॲसिड लेव्हल वाढल्यानंतर साधारणतः दिसतात.

यूरिक ॲसिड नैसर्गिकरीत्या कसं व्यवस्थापित करायचं ?

यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित राहण्यासाठी रेड मीट आणि ऑर्गन मीट,

समुद्री खाद्यपदार्थ, तळलेले आणि प्रक्रिया केलेली पदार्थ, साखरयुक्त पेय आ

णि गोड पदार्थ,

आंबवलेले पदार्थ, शिवाय उडदाची डाळ, राजमा, तूर डाळ

अशा पदार्थांचे जास्त सेवन केल्याने यूरिक ॲसिड लेवल वाढू शकते.

यूरिक ॲसिड पातळी कमी करण्यासाठी काय खावं?

यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी चेरी आणि जांभूळ, आवळा,

भोपळा, धन्याचं पाणी, जिऱ्या सोबत ताक घेणे फायदेशीर ठरेल.

शिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रोज दोन ते पाच लिटर पाणी प्यायलं पाहिजे.

नारळ पाणी, जिरे आणि ओव्याचं पाणी, कोमट दूध आणि हळद घेणे सुद्धा परिणामकारक ठरेल.

कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन मात्र मर्यादितच ठेवा

 

सदर उपाय हे केवळ माहितीच्या उद्देशानं दिले असून अधिक माहिती साठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा 

Share This News
error: Content is protected !!