UDAY SAMANT ON PMC: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार

UDAY SAMANT ON PMC: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार

172 0

UDAY SAMANT ON PMC:  पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या

लगतच्या ३२ गावांसाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत विकास आराखडा करण्यात येत आहे.

या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविण्यात येऊन

UDAY SAMANT MEET RAJ THACKERAY | राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय चर्चा? उदय सामंत यांनी सगळंच सांगितलं.

या गावांना विकासात्मक न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत (UDAY SAMANT ON PMC) यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य योगेश टिळेकर यांनी पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या ३२ गावांचा पुणे महापालिकेत समावेश झाल्यामुळे

पुणे महानगरपालिकेचे विभाजन करुन पूर्व पुण्यासाठी नवीन महानगरपालिका निर्माण करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्यावर मंत्री उदय सामंत यांनी ३२ गावांच्या विकासाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मंत्री सामंत म्हणाले, पुणे महानगरपालिकेत

समाविष्ट ३२ गावांपैकी ११ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्याची कार्यवाही सुरू होती.

UDAY SAMANT l कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित; मराठी भाषा दिनी मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

विकास आराखड्याची मुदत संपल्याने सध्या शासनामार्फत त्यावर पुढील कार्यवाही चालू आहे.

तसेच समाविष्ट २३ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

UDAY SAMANT| मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साधला साहित्यिकांशी संवाद

या गावांना पाणीपुरवठा, विद्युत, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करुन विकासात्मक न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!