UDAY SAMANT

UDAY SAMANT l कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित; मराठी भाषा दिनी मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

5129 0

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित करण्यात आले.

शिरवाडे वणी आता “कवितांचे गाव” म्हणून ओळखले जाणार असल्याने गावकऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी हाती घेतलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरेल, असे मला वाटते. साहित्यिकांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी असा उपक्रम राबविला गेला, हे मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. असं प्रतिपादन उदय सामंत (UDAY SAMANT) यांनी केलं

या प्रसंगी मंत्री दादाजी भूसे, दिलीपकाका बनकर, शोभा बच्छाव, हेमंत टकले, भाऊ चौधरी तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नात पियू शिरवाडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

UDAY SAMANT| मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साधला साहित्यिकांशी संवाद

Uday Samant : महाराष्ट्रात लवकरच येणार 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Share This News
error: Content is protected !!