PM NARENDRA MODI

NARENDRA MODI: गांधीजींच्या ‘वैष्णव जन’ या आवडत्या गाण्यामुळे जग एकत्र आले;वेव्हज 2025″ परिषदेचे थाटात उद्घाटन

365 0

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी जगभरातील लाखो रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली असून प्रत्येक कथा ही भारतीय संस्कृतीचा आवाज बनली आहे, असे सांगतानाच गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त मी त्यांचे आवडते भजन “वैष्णव जन ” सर्वांना गायला सांगितले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जगभरातील कलाकारांनी ते गायले. त्याचा परिणाम म्हणजे, जग एकत्र आले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी गुरुवारी काढले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आयोजित “WAVES 2025” या जागतिक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. ही परिषद ४ मे पर्यंत सुरू राहील.

मोदी म्हणाले की, आज १०० हून अधिक राष्ट्रांमधील कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. आम्ही प्रतिभा आणि सर्जनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचत आहोत. वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्याचे जागतिक व्यासपीठ बनलेले आहे.
गेल्या शतकात,भारतीय चित्रपटसृष्टीने जगाच्या प्रत्येक भागात लोकप्रिय यश मिळवले आहे. राज कपूर यांची रशियातील, सत्यजित रे यांची कान्समधील तर आरआरआरच्या ऑस्करमधील लोकप्रियतेच्या यशाचा प्रामुख्याने समावेश आहे.

भारतात ११२ वर्षांपूर्वी म्हणजे, ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. दादासाहेब फाळके या चित्रपटाचे निर्माते होते. राष्ट्रीय मंचावर टपाल तिकीटे प्रसिद्ध करून भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचे आम्ही स्मरण केले आहे. गेल्यावर्षी, गेमिंगमुळे संगीत क्षेत्रातील लोकांची भेट झाली. भारताच्या सर्जनशील क्षमतेबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“व्हेवज 2025” या परिषदेत जगातील तब्बल ९० देशांमधून सुमारे १० हजार प्रतिनिधी, १ हजार निर्माते, ३०० कंपन्या आणि ३५० स्टार्टअप्स सहभागी झाले आहेत.
त्यामध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन, गुगल, मेटा, ॲडोब टाटा, सोनी, रिलायन्स, यश राज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स, सारेगामा आणि जेटसिंथेसिस, न्यूरल गॅरेज, फ्री स्ट्रीम टेक यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या परिषदेत टेलीकास्ट, इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मीडियासह विविध क्षेत्रांमध्ये ४२ सत्रे, ३९ ब्रेकआउट सत्रे आणि ३२ मास्टरक्लास होणार आहेत.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर येथे सदनिकांचे हस्तांतरण संपन्न

Share This News
error: Content is protected !!