नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी : राणा यांच्या वकिलाची मागणी

548 0

मुंबई- नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

सदरचे पत्र २९ एप्रिलला पाठवले आहे. हे पत्र कारागृह अधीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक तसेच लोकसभा अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. या पत्रात लिहिले आहे की नवनीत राणा यांना स्पॉंडिलिसिसचा आजार असून कारागृहात त्यांना जमिनीवर झोपावे लागत असल्यामुळे तिचा आजार वाढत चाललं असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्याचे सिटी स्कॅन केल्यानंतरच स्पॉंडिलिसिसचा आजार किती गंभीर आहे याचे निदान होऊ शकते. तरी नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी अशी मागणी वकील रिझवान मर्चंट यांनी केली आहे.

या पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, त्यांना वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यास नवनीत राणा यांना काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कारागृह प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे.

वारंवार विनंती केल्यानंतर नवनीत राणा यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असे या पत्रामध्ये म्हटले आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका झाल्यास जेल प्रशासन त्याला जबाबदार राहील असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!