बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत त्यांनंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली.
या विधेयकावर मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान पार पडलं. विधेयकाच्या बाजूने 288 इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 इतकी मतं पडली आहेत. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे.
दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेत मोठ्या प्रमाणावर वादळी चर्चा झाली होती. त्यानंतर लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात केंद्र सरकारला यश आला असला तरी राज्यसभेत हे विधेयक पारित होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.