राज्यात एकीकडे गुन्हेगारी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असतानाच यासह पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरण ताज असताना भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (RAKSHA KHADSE)यांच्या मुलीसोबत टवाळखोरांकडून छेडछाड करण्यात आली. जर केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्यांच्या मुलींचं काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय… रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? पाहूया यावरचा हा रिपोर्ट.
जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये यात्रा सुरू आहे.. यात्रेत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत गेली होती.. याचवेळी काही टवाळखोरांकडून खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची ही छेड काढण्यात आली. खडसेंची मुलगी क्रिशिका आपल्या मैत्रिणींसोबत आकाश पाळण्यात बसली होती. याच दरम्यान टवाळखोर देखील आले. मुली सोबत एक पोलीस सुरक्षारक्षक देखील होते. मात्र त्यांच्यावर टवाळखोरांकडून दादागिरी करण्यात आली. मुलींच व्हिडिओ चित्रीकरण टवाळखोर करत होते.. रक्षा खडसे अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सुरक्षारक्षकाला काही दाद दिली नाही. छेडछाड करणाऱ्या मुलांनी मुलींना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर पसार झाले. रक्षा खडसे या कामानिमित्त बाहेर होत्या. पण ज्यावेळी त्या मुक्ताईनगर मध्ये पोहोचल्या त्यानंतर मुलीने त्यांना सगळं घटनाक्रम सांगितला. तिथून पुढे त्यांची मुलगी आणि मैत्रिणींसह त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. टवाळखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..तसंच त्यांना कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी रक्षा खडसेंनी केली आहे. यासह जर एका खासदाराची केंद्रीय मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्व सामान्यांच्या मुली अशा सुरक्षित समजायच्या असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणानंतर जळगावातलं वातावरण तापल आहे. घडलेल्या प्रकारावर एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..
राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालल आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा काहीच धाक उरला नाही अशीच स्थिती राज्यभरात पाहायला मिळतेय… त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जातय.. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात देखील अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे त्या प्रकरणासह रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात पुढे काय अपडेट्स समोर येणार ते पाहणं महत्त्वाच असेल.
BREAKING NEWS स्वारगेट बस अत्याचार प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी