दौंडमध्ये कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईने पोटच्या दोन मुलांना संपवलं; पतीवर ही केले वार
पुण्याच्या दौंडमधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आईने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिंढे या 30 वर्षीय महिलेला अटक केली आहे. कोमल मिंढे या महिलेने आपल्या अवघ्या एक आणि तीन वर्षाच्या चिमुकल्याला गळा दाबून झोपेतच संपवलं. शंभू आणि पियू अशी या चिमुकल्यांची नावे होती. आरोपी कोमल मिंढेने पती दुर्योधन आबासाहेब मिंढे यांच्यावरही कोयत्याने मानेवर आणि हातावर वार करून जखमी केल आहे. कोमल मिंढेच्या पतीचं वय 35 वर्ष आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळावरून घेतलेला या घटनेचा प्रत्यक्ष आढावा पाहुयात.
