मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये रंगला कलगीतुरा

4276 0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवड मधील अनेक ठिकाणी विविध उपक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मात्र यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला तो अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात झालेला शाब्दिक श्रेयवाद. महेश लांडगे यांनी अजित पवार यांचं कुठेही नाव न घेता पिंपरी- चिंचवड शहराचा विकास हा २०१४ नंतरच महायुती सरकारच्या काळात झाल्याचं म्हटलं आणि त्यानंतर सुरु झालं ते शाब्दिक वॉर. पिंपरी-चिंचवड शहर हे देवेंद्र फडणवीस यांच्याचमुळे प्रगतीपथावर आल्याचं लांडगे म्हणाले. यावर अजित पवार मात्र संतापले आणि महेश लांडगेंना सुनावलं.

अजित पवारांनी महेश लांडगे यांना सुनावत म्हटलं की, मी अनेकदा पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेलो आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे जे चांगलं काम करतात त्याला चांगलं म्हणायला शिका. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं. त्यानंतर झालेल्या भाषणा दरम्यान महेश लांडगे यांनी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले,असं म्हणत त्यांचं अजित पवारांसमोर कौतुक केलं आणि हाच धागा धरून अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना चांगलं सुनावलं. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं, हे मला माहित नाही. परंतु, ज्यानं चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका, असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे. पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार असेल तर स्वतंत्र शिवनेरी जिल्हा करावा असं महेश लांडगेंनी म्हटलं यावर अजित पवारांनी शिवनेरी जिल्हा होणार नाही ना पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार असल्याचं म्हटलं. यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं ही अजित पवार म्हणाले.

 

 

 

 

Share This News
error: Content is protected !!