MAHARASHTRA KESARI WINNER 2025 | पैलवान पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

2366 0

MAHARASHTRA KESARI WINNER 2025 अहिल्यानगर मध्ये पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा

महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला असून महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे

16 सेकंद राहिलेले असताना महेंद्रने मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केलं.

या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी झालेल्या पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली आहे.

पैलवान घरातील आपण चौथ्या पिढीचे पैलवान असून वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळने दिली.

तसेच वडिलांना खांद्यावर घेऊन पृथ्वीराज मोहोळने मैदानात जल्लोष केला आहे.