पुण्यातील एका इमारतीत कारच्या विचित्र अपघाताचे सिसिटीव्ही फुटेज समोर

299 0

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशात पुण्यातल्या विमाननगर परिसरात एका कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक कार इमारतीच्या पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून थेट खालच्या भागातील पार्किंगमध्ये कोसळली. विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट या इमारतीत हा अपघात घडला. या इमारतीच्या पहिल्या मजल्या वरील पार्किंगमध्ये गाडी मागे घेताना कार चालकाच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली. 20 जानेवारीला सकाळी 10 वाजता हा प्रकार घडला. परंतु या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शुभ अपार्टमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना दिसत आहे. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये चालकाने कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली. इमारतीच्या पार्किंगची भिंत ही पोकळ असल्यामुळे कारची धडक बसल्यामुळे भिंत लगेच तुटली आणि कार खाली कोसळली. पहिल्या मजल्यावरुन कोसळल्यानंतर कार उभीच राहिली. सुदैवाने कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

 

Share This News
error: Content is protected !!