Breaking News, राज ठाकरे यांची सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्यालाच एक लाखांचा दंड

220 0

औरंगाबाद- राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्याला १ लाखांचा दंडही ठोठावला आहे.

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही सभा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिकन युवा मोर्चाकडून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे करण्यात आली होती. सभा आणि रॅलीला मनाई करणारा हुकूम द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

न्यायालयात सुनावणीच्यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलेले आदेश सादर करण्यात आले. तसेच सभेबाबत पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर संबंधित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नमूद करून याचिकाकर्त्यांना १ लाखांचा दंड ठोठावून याचिका फेटाळून लावली.

Share This News
error: Content is protected !!