शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

485 0

मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र राहुल शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी निर्दोष आहे आणि यासाठी मी कोणत्याही चौकशीला तयार असून या तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पर्दाफाश करेन, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.

यापूर्वी देखील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात पुण्यात एका तरूणीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आणि पीडित तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला. आपल्याला डांबून ठेवून आपल्याला विशिष्ट जबाब देण्यास भाग पाडले असे या तरुणीने म्हटले होते.

Share This News
error: Content is protected !!