ब्रेकिंग न्यूज

खड्ड्यामुळं गेला जीव? छे छे! खड्ड्यामुळं आला जीव!अंत्ययात्रेची तयारी; संबंधित व्यक्ती स्वत:च्या पायावर घरी!

आजवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं अनेकांचे जीव गेल्याचं आपण पाहिलं आहे मात्र खड्ड्यामुळं गेलेला जीव परत आल्याचं कधी ऐकलंय का? कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे मात्र ही विस्मयकारक घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळं जीवदान मिळाल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय घडलं या वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत? पाहूयात…

कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर एकेक करत पांडुरंग तात्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी जमू लागले. अंत्यविधीची तयारी झाली आणि सर्व जण त्यांना घेऊन येणाऱ्या रूग्णवाहिकेची वाट पाहात थांबले. मात्र, रूग्णालयातून पांडुरंग तात्यांना घरी घेऊन जाणारी रूग्णवाहिका खड्ड्यात आदळली आणि त्याच वेळी पांडुरंग तात्यांची अचानक हालचाल सुरू झाली. हे लक्षात येताच नातेवाइकांनी रूग्णवाहिका पुन्हा एकदा कदमवाडी येथील दवाखान्याकडं वळवली. तात्यांवर पुन्हा उपचार करण्यात आले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले आणि मग शुद्धीवर येऊन पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं. हे सर्व कसं काय घडलं यावर पांडुरंग तात्यांचे नातेवाईक एकच उत्तर देताना पाहायला मिळालं… ही सर्व पांडुरंगाची कृपा!

#SomnathGaikwad : वनराजच्या हत्येचा मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड आहे तरी कोण ?