महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदी भाजपाच्या प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आणि असून राम शिंदे हे विधान परिषदेचे 19 वे सभापती ठरले आहेत. राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून..
1 जानेवारी 1969 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेले राम शिंदे यांनी ‘एम एसस्सी बीएड’ पर्यंतचे शिक्षण घेत सुरुवातीच्या काळात प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली आहे. त्यानंतर 1997 मध्ये राम शिंदे यांनी पहिल्यांदा पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र अवघ्यात 200 मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/
त्यानंतर 2000 मध्ये चौंडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवत ते विजयी झाले आणि सलग पाच वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. 2006 मध्ये राम शिंदे यांची जामखेड भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आणि 2009 मध्ये ते कर्जत जामखेड विधानसभेतून पहिल्यांदा निवडणूक लढवत विधानसभेत पोहोचले.
या काळात त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर प्रदेश भाजपाचे सरचिटणीस म्हणूनही काम केलं त्यानंतर 2014 ला ते पुन्हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये गृह,पणन, आरोग्य आणि पर्यटन या खात्यांचे राज्यमंत्री झाले. यानंतर राम शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यांनी मृदा व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्यांची जबाबदारी सांभाळली. मात्र नंतर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं त्यानंतर भाजपा कडून त्यांचे विधान परिषदेवर वर्णी लागली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली मात्र अवघ्या 1243 मतांनी त्यांचा पराभव झाला.राम शिंदे यांच्या रूपाने तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र विधानसभेला सभापती मिळणार असून राम शिंदे हे 19 सभापती असणार आहेत.
RAM SHINDE | राम शिंदेंनी भरला विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज; कसं आहे पक्षीय बलाबल ?
VIDHANSABHA 2024: डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय रे भाऊ ? डिपॉझिट जप्त कधी होतं ? वाचा सविस्तर