eknath Shinde

मंत्री व्हा पण केवळ अडीच वर्ष; मंत्रिपदाचा नेमका फॉर्मुला आहे तरी काय?

372 0

राज्यात देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार (MAHAYUTI GOVERNMENT) सत्तेत आल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे (CABINET EXPENSION) लागलं आहे.

नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाअगोदर (Winter Session) मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जात असतानाच 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जात आहे.

पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे Eknath Shinde) अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मुला लागू करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले असले तरी मंत्री होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत संजय शिरसाठ भरत गोगावले विजय शिवतारे आदी नवीन चेहऱ्यांना एकनाथ शिंदे संधी देतील असं बोललं जात असून सध्या मंत्री असणाऱ्या काही चेहऱ्यांना डच्चू दिला जाऊ शकतो अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिमंडळात कुणाची लागू शकते वर्णी 

  1. गुलाबराव पाटील
  2. उदय सामंत
  3.  भरत गोगावले
  4. दिपक केसरकर
  5. शंभूराज देसाई
  6. गुलाबराव पाटील
  7.  तानाजी सावंत
  8. दादा भुसे
  9.  निलेश राणे
  10. प्रताप सरनाईक
  11. राजेश क्षीरसागर
  12. आशिष जैस्वाल
  13.  नीलम गोऱ्हे
  14.  अमोल खताळ
  15.  विजय शिवतारे
  16. मंजुळा गावीत

CABINET Expansion: अखेर ठरलं! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

 

Share This News
error: Content is protected !!