BEED CRIME: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून

401 0

बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून बीड मधील मस्साजोगा गावचे सरपंच (Sarpanch) संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.

त्यामुळे बीड जिल्ह्यात (Beed) खळबळ उडाली आहे. हत्या आणि अपहरण कोणी केलं? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

संतोष पंडीतराव देशमुख (Santosh Pandotrao deshmukh) हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे त्यांच्या टाटा इंडिगोने मस्साजोगकडे जात होते. ते केजहून मस्साजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याजवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ त्यांच्या वाहनासमोर आडवी लावली. त्या स्कार्पिओतून सहा जण खाली उतरले.

त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडून कारमध्ये पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजुला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली.

PUNE CRIME: नववीतील विद्यार्थ्याने वर्गातच चिरला दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा; धक्कादायक कारण आलं समोर

YOGESH TILEKAR: आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाचा खून

PUNE POLICE ON CRIME दहशत वाजवणाऱ्या रिल्स दिसल्यास करणार थेट कारवाई

Share This News
error: Content is protected !!