डॉ.दाभोलकर यांच्या मेंदू व छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्या; डॉ. तावरे यांची साक्ष

439 0

शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेंनी न्यायालयाला सांगितले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते. त्यापैकी डॉ. तावरे यांची साक्ष सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदवली.“डॉ. दाभोलकर यांचा मृतदेह सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयातील शवागारात आणण्यात आला. रुग्णालयाच्या नियमावलीनुसार, दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली,’ अशी साक्ष डॉ. तावरे यांनी नोंदवल्याचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी सांगितले.दरम्यान, 6 मे रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide