VIJAY RUPANI: मुख्यमंत्री निवडण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले विजय रुपाणी कोण?

240 0

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती 230 जागा जागा मिळवत स्पष्ट बहुमतात सत्तेत आली. मात्र आज निकाल लागून 10 दिवस झाल्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आता भाजपाकडून निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय रुपाणी कोण आहेत?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाकडून निवडण्यात आलेले विजय रुपाणी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. 2012 पर्यंत विजय रुपाणी यांनी राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केलं असून सध्या त्यांच्याकडे पंजाब आणि छत्तीसगड राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे

Share This News
error: Content is protected !!