बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने “12फेल” या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा मालिकेतून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायक होता. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात, काही जण स्वतःहून निवृत्ती घेतात. तसेच, विक्रांत मेस्सी आपल्या वयाच्या ३७ व्या वर्षी अभिनय क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.
आज सकाळी विक्रांतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत घोषणा केली. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्षे अत्यंत अद्भुत होती. तुमच्या अपार पाठिंब्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. पण जसजसा मी पुढे जात आहे, तसतसे मला जाणवते की आता घरी परत जाण्याची वेळ आली आहे, पती, वडील, मुलगा आणि अभिनेता म्हणूनही.”
विक्रांतने आपल्या निवृत्तीसाठी 2025 पर्यंतचा कालावधी दिला आहे. “2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचा वेळ भेटू. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही, शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी,” अशी त्याने स्पष्ट केले. त्याच्या पोस्टमध्ये “सदैव ऋणी” असे शब्द वापरून विक्रांतने आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विक्रांतचा अभिनयाच्या क्षेत्रातील हा निर्णय अनेकांना धक्का देणारा आहे, कारण ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले होते.