Breaking News

महायुतीची मुंबईतील आजची बैठक रद्द! नेमकं काय घडतंय?

4388 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली असून एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी रवाना झाले आहेत.

आज होणारी बैठक 2 दिवसांनी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सोबतच शिवसेना आमदारांची आज होणारी बैठकदेखील पुढे ढकलण्यात आली आहे.

दिल्लीतील बैठकीत काय ठरलं? 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार भाजपा दोन दिवसात आपला विधिमंडळ गटनेते निवडणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

133 जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपाकडेच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद राहणार असून मुख्यमंत्री पदासह महसूल व गृह अशी दोन महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहणार आहेत.

एकनाथ शिंदे यांचा महायुतीत योग्य सन्मान राखला जाईल असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार आहे

उपमुख्यमंत्री, अर्थ विभाग अजित पवारांकडे

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाबरोबर अर्थ खातं देखील दिलं जाणार असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे

Share This News
error: Content is protected !!