संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न अर्थातच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून ओबीसींना योग्य संधी मिळेल महायुतीत एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जाईल असं ठरलं आहे.
भाजपा दोन दिवसात चेहरा निवडणार
आज राजधानी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार भाजपा दोन दिवसात आपला विधिमंडळ गटनेते निवडणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
मुख्यमंत्रीपदासह महसूल आणि गृहखातं भाजपाकडे
133 जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपाकडेच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद राहणार असून मुख्यमंत्री पदासह महसूल व गृह अशी दोन महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहणार आहेत.
नगरविकास सार्वजनिक बांधकाम शिंदेंच्या शिवसेनेकडे
एकनाथ शिंदे यांचा महायुतीत योग्य सन्मान राखला जाईल असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार आहे
उपमुख्यमंत्री व अर्थखातं अजित पवारांकडे
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाबरोबर अर्थ खातं देखील दिलं जाणार असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे