खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपीने गाठलं पोलीस ठाणं; पुण्यात नेमकं चाललंय काय?

388 0

कंपनीतील माजी कर्मचाऱ्याचा कुऱ्हाडीने खून करुन हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपी मालक थेट पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद गोपीचंद मनवानी (वय 46, रा. गेलॉर्ड चौक, पिंपरी) असं आरोपीचं नाव असून महेश सुंदरदास मोटवानी (वय 45) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मोटवानी हे मनवानी यांचे शेजारी असून त्यांच्याच कंपनीतील माजी कर्मचारी होते.

मनवानी याने वयक्तिक वादातून मोटवानी यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि खांद्यावर कुऱ्हाडीने 7-8 वार केले. हा प्रकार घडताना मोटवानी यांची पत्नी देखील घरीच होती. मात्र वर केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मोटवानी यांना सोडून आरोपीने थेट पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षकांच्या चेंबरमध्ये जाऊन कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली त्यावेळी परिसरातील लोकांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात नेलं होतं. परंतू उपचारांपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दरम्यान पोलिसांनी आरोपी मनवानीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!