सलग 72 वर्षांपासून एका मतदार संघावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऐतिहासिक घराण्याची गोष्ट

601 0

विधानसभा 2024 मध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागले. अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यात असा एक मतदारसंघ आहे, तुमच्या ठिकाणी गेल्या 72 वर्षांपासून एकाच कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. या कुटुंबाने राज्याला मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार दिले. हे कुटुंब आहे वसंतराव नाईक यांचं मतदार संघ आहे पुसद.

मतदारसंघाचा इतिहास

विदर्भातील पुसद या मतदारसंघात 1952 पासून सलग एकाच कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. म्हणजे सलग 72 वर्ष एकाच कुटुंबाने या मतदारसंघात निवडून येण्याचा विक्रम केला आहे. 1952 मध्ये पहिल्यांदाच वसंतराव नाईक हे पुसद मधून निवडून आले. त्यानंतर सलग पाच टर्म ते या मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर ते थेट राज्याचे तिसरे मुख्यमंत्री झाले. ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ विराजमान होणारे नेते आहेत. वसंतराव नाईक यांनी तब्बल बारा वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं.

पुढे 1978 मध्ये वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे निवडून आले. त्यानंतर सलग चार वेळा ते या मतदारसंघाचे आमदार राहिले. 1991 मध्ये ते देखील राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतर 1995 मध्ये त्यांचेच बंधू मनोहरराव नाईक हे पुसदचे आमदार झाले.

पक्षांतरानंतरचा काळ

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि नाईकांनी पक्षांतर केलं. या कुटुंबाला पक्षांतराचा फटका बसेल अशी शक्यता असतानाही पुढच्या निवडणुकीत नाईकांनी आपला गड राखलाच. पुन्हा सुधाकरराव नाईक आमदार झाले. 2004 मध्ये पुन्हा मनोहरराव आमदार झाले. सलग तीन टर्म आमदार झाल्या नंतर 2019 ला त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हे देखील या मतदारसंघातून निवडून आले. अशा पद्धतीने नाईक कुटुंबाने 1952 पासून आत्तापर्यंत पुसद मतदार संघातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

उच्चपदं भूषवणार घराणं

पुसद मधील या नाईक घराण्याने वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक यांच्या रूपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मनोहरराव नाईक आणि अविनाश नाईक यांनी मंत्री पदं भूषवली. त्याचबरोबर इंद्रनील नाईक आणि निलय नाईक या दोघांनी आमदारकी भूषवली. त्यामुळे राजकारणातील उच्चपदं भूषवणारं हे कुटुंब आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!