महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्रीपदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे.त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजपाला मुख्यमंत्री पदाबरोबर अनेक महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
भाजपाला कोणती खाती मिळणार?
गृह
सहकार
वन व पुनर्वसन
आरोग्य
उच्च व तंत्रशिक्षण
ऊर्जा