महत्वाची बातमी, ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जाणार

394 0

नवी दिल्ली- आता वय वर्ष सहा ते बारा या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येईल. आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत लहान मुलांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र आता कोरोनाच्या नव्या एक्सई या वेरीएन्टमुळे अनेक चिमुरड्यांना संसर्ग होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. गेल्या तीन आठवड्यात मुलांमध्ये तापाची लक्षणे वाढत असल्याचेही दिसून आलेले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच आता कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अचानक वाढू नये, यासाठी वेळीच खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून आली, तर घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही केले जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारे सौम्य लक्षणांना दुर्लक्ष करुन चालणार नाही असेही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लहान मुलांना कोणती लक्षणे ?

नाक वाहणे , सर्दी होणं
घसा खवखवणे
अंगदुखी
सुका खोकला
उलट्या जुलाब होणे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!